Swami Vivekananda | Krishnaniti Combo Books Set in marathi | स्वामी विवेकानंद पुस्तक : जीवन, विचार आणि कार्य Jivan Charitra Motivational Biography … बेस्टसेलर बेस्ट सेलर संच पुस्तकं, बुक्स बुक

Swami Vivekananda | Krishnaniti Combo Books Set in marathi | स्वामी विवेकानंद पुस्तक : जीवन, विचार आणि कार्य Jivan Charitra Motivational Biography … बेस्टसेलर बेस्ट सेलर संच पुस्तकं, बुक्स बुक

Swami Vivekananda | Krishnaniti Combo Books Set in marathi | स्वामी विवेकानंद पुस्तक : जीवन, विचार आणि कार्य Jivan Charitra Motivational Biography … बेस्टसेलर बेस्ट सेलर संच पुस्तकं, बुक्स बुक
Price: ₹500 - ₹299.00
(as of Apr 07, 2026 18:49:01 UTC – Details)



जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या.
बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला.
श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती. कृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात.
डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.
या पुस्तकात कृष्णाचे उलगडलेले नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व, त्याचे डावपेच, त्याची रणनीती, त्याचा प्रेमाचा सिद्धांत आपण सर्वांनीच आज आचरणात आणला तर आपली आणि आपल्या या भारत देशाची निश्चितच प्रगती होईल.
अर्थात २१ व्या शतकातही आपला ‘प्रिय कृष्ण’ आचरणीय आहे, गरज आहे ती फक्त त्याच्या नीतीकडे डोळसपणे पाहण्याची!

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’
जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात.
जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!

From the Publisher

Swami Vivekananda | KrishnanitiSwami Vivekananda | Krishnaniti

Swami Vivekananda | KrishnanitiSwami Vivekananda | Krishnaniti

Swami Vivekananda | KrishnanitiSwami Vivekananda | Krishnaniti

Swami Vivekananda | KrishnanitiSwami Vivekananda | Krishnaniti

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2023
Print length ‏ : ‎ 416 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352206819
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352206810
Item Weight ‏ : ‎ 379 g
Dimensions ‏ : ‎ 14 x 2.1 x 21.1 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar (Aurangabad) 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar (Aurangabad) 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book
Best Sellers Rank: #353,769 in Books (See Top 100 in Books) #2,081 in History of Religion (Books) #3,940 in Spirituality (Books) #12,248 in New Age & Spirituality

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *